गॅस सिलेंडरचे योग्य नियोजन करून वाटप करण्याच्या एजन्सीला सूचना
लातूर, 16 मार्च (हिं.स.)। सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याची चर्चा होत असून या संदर्भात उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली औसा तालुक्यातील गॅस एजन्सी धारकांची बैठक घेऊन घरगुती वापराच्य
गॅस सिलेंडर


लातूर, 16 मार्च (हिं.स.)।

सध्या सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याची चर्चा होत असून या संदर्भात उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली औसा तालुक्यातील गॅस एजन्सी धारकांची बैठक घेऊन घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर धारकांना योग्य नियोजन करून सिलेंडरचे वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या अफवावर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये तसेच गॅस सिलेंडरचा कोणत्याही प्रकारे तुटवडा भासणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्याच्या सूचना एजन्सी धारकांना दिल्या आहेत. कोणत्याही एजन्सी धारकाकडून गॅस सिलेंडरची साठेबाजी किंवा काळाबाजार होत असल्याचे आढळून आल्यास संबंधित एजन्सीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम कायदा १९५५ अंतर्गत कार्यवाही - करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.

ज्या ग्राहकाकडे दोन गॅस सिलेंडर आहेत असे ग्राहक तात्काळ बुकिंग करण्यासाठी घाई करीत असून तांत्रिक अडचणीमुळे वेळेत बुकिंग होत नसल्याने नागरिकात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु गॅस ग्राहकधारकांनी घाबरून जाऊ नये घरगुती गॅस सिलेंडरचा हॉटेल ढाबे किंवा वाहनांमध्ये वापर होत असल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येणार असून अवैधरित्या रिफिलिंग रोखण्यात येणार आहे. या कामी पुरवठा विभाग सज्ज असल्याने व घरगुती गॅस सिलेंडर धारकांना नियमाप्रमाणे बुकिंग केल्यास निर्धारित वेळेत गॅस सिलेंडर शासनमान्य दरातच देण्यात यावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या असून गॅस सिलेंडरचा पुरवठा पुरेसा उपलब्ध असून ग्राहकांनी इतर वर्तमानपत्रातील बातम्या किंवा अफवावर विश्वास ठेवू नये असा संदेश ग्राहकांना पाठविण्याच्याही सूचना एजन्सीला देण्यात आल्या आहेत अशी माहिती पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार प्रियंका बोरकर यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande