
पुणे, 16 मार्च (हिं.स.)। पुणे महापालिकेच्या हद्दीत स्टॉल व पथारी लावून उदरनिर्वाह करणाऱ्या लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी महापालिकेत अभय योजनेच्या धर्तीवर सवलत योजना राबवण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. स्टॉलधारकांवर वाढलेल्या भाडे आणि दंडाच्या आर्थिक ओझ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव मांडण्यात आला असून, तो सध्या प्रशासनाच्या विचाराधीन पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावावर अंतिम निर्णय प्रशासनाकडून घेतला जाणार आहे.महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये अनेक गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिक छोटे स्टॉल लावून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, गेल्या काही वर्षांतील आर्थिक परिस्थिती, वाढलेला खर्च आणि व्यवसायातील मंदीमुळे या व्यावसायिकांना स्टॉलचे मासिक भाडे आणि त्यावरील दंड भरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. ---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु