
नांदेड, 16 मार्च (हिं.स.)।
भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास प्रकोष्ठ अध्यक्षपदी मनोहर पाटील शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने माजी जि.प. सदस्य मनोहर पाटील शिंदे यांची पंचायत राज व ग्रामविकास (प्रकोष्ठ) अध्यक्ष पदावर माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण त्यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र महानगर जिल्हाध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी दिले. भारतीय जनता पार्टी नांदेड महानगरच्या वतीने देण्यात आलेल्या या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, मनोहर शिंदे यांनी पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल माजी जि.प. सदस्य मनोहर शिंदे यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. सदरील नियुक्ती बद्दल पक्षातील कार्यकर्ते व मित्रमंडळी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis