भगवान वैजनाथांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो - संजय शिरसाट
बीड, 16 मार्च (हिं.स.)। भगवान वैजनाथांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी परळी येथे केली. बीड जिल्ह्याच्या परळी येथे मंत्री संजय शिरसाट आले होते परळी
अ


बीड, 16 मार्च (हिं.स.)।

भगवान वैजनाथांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी परळी येथे केली. बीड जिल्ह्याच्या परळी

येथे मंत्री संजय शिरसाट आले होते

परळी दौऱ्याच्या निमित्ताने पवित्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे जाऊन भगवान वैजनाथांचे मनोभावे दर्शन घेण्याचा योग आला.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पवित्र स्थानी नतमस्तक होत भगवान वैजनाथांच्या चरणी प्रार्थना केली. या दिव्य दर्शनाने मन अत्यंत प्रसन्न झाले व आध्यात्मिक समाधान लाभले.

यावेळी मंदिराच्या वतीने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मंदिर प्रशासन तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

भगवान वैजनाथांच्या कृपेने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो, अशी प्रार्थना त्यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande