बीड जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ओमराजे सातपुतेचा डंका
बीड, 16 मार्च (हिं.स.)। द. बा. घुमरे पब्लिक स्कूल, बीड आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चंपावती शाळेचा विद्यार्थी ओमराजे परमेश्वर सातपुते याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले. स्पर्धेत आपल्या प्रभावी वक्तृत्वाने ओमराजेने सर्वां
बीड जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ओमराजे सातपुतेचा डंका


बीड, 16 मार्च (हिं.स.)।

द. बा. घुमरे पब्लिक स्कूल, बीड आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चंपावती शाळेचा विद्यार्थी ओमराजे परमेश्वर सातपुते याने प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्ज्वल केले. स्पर्धेत आपल्या प्रभावी वक्तृत्वाने ओमराजेने सर्वांची मने जिंकली. या यशाबद्दल ओमराजेचा सन्मान सोहळा उत्साहात पारपडला. यावेळी माजी आमदार राजेंद्र जगताप, बाजार समितीचे माजी सभापती अरुण डाके, उद्योजक रमेश पोकळे आणि सचिव दीपक घुमरे यांच्या हस्ते ओमराजेला सन्मानचिन्ह व ५१०० रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. ओमराजेच्या या यशात शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून स्वागत होत असून, पालकांसह शाळेत आनंदाचे वातावरण आहे.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande