
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती कल्याण नाना गायकवाड आणि उपसभापती बाळासाहेब गाडे यांच्या पदग्रहण सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी राज्याचे दुग्धविकास मंत्री तसा भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल सावे यांच्या उपस्थितीत होते.
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूक मध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले यानंतर सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका देखील भारतीय जनता पक्षाने जिंकल्या. जनतेने भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले आहे त्यामुळे नागरिकांच्या कामांची दखल आम्ही घेणार असल्याचे सावे यांनी सांगितले ग्रामीण भागाच्या विकासात पंचायत समितीची भूमिका महत्त्वाची आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत विकासकामांना गती देण्यासाठी ते पुढाकार घेतील असा विश्वास आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis