
रत्नागिरी, 16 मार्च, (हिं. स.) : भारतीय जनता पक्षाचे पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान देशभरात राबवले जात आहे. भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील रत्नागिरी शहर मंडळात हे निवासी शिबिर पार पडले.
या अभियानासाठी शहर अध्यक्ष दादा ढेकणे, अभियानाचे प्रमुख मुक्ता बाष्टे , प्रसाद बाष्टे, संदीप सुर्वे यांनी नियोजन केले. हे निवासी प्रशिक्षण ल. वि. केळकर सभागृहात मोठ्या उत्साहात झाले. उद्घाटन रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षाताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या हस्ते झाले.
शिबिरात भारतीय जनता पार्टीचा इतिहास, वैचारिक अधिष्ठान, कार्यविस्तार आणि दृष्टिकोन, आपली कार्यपद्धती, सोशल मीडिया, मन की बात आणि आगामी कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या विषयावर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास रत्नागिरी शहर मंडलातून 50 पेक्षा अधिक कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या अभियानामुळे भारतीय जनता पार्टीचे विचार सर्वदूर पसरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी, संघटन अधिक मजबूत करण्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे.
शिबिरात वैचारिक अधिष्ठान या विषयावर अॅडव्होकेट बाबासाहेब परुळेकर यांनी मार्गदर्शन केले पार्टीचा इतिहास व विकास याबाबत सचिन वहाळकर यांनी माहिती दिली. पार्टीचा कार्यविस्तार आणि दृष्टिकोन याबाबत नीलेश आखाडे यांनी तर आपली कार्यपद्धती या विषयावर डॉ. मुक्ता बाष्टे, सरकारच्या योजनांविषयी डॉ. ऋषिकेश केळकर यांनी मार्गदर्शन केले. दुपारनंतरच्या सत्रामध्ये सोशल मीडियाबाबत नीलेश मराठे व बूथ प्रबंधन आणि मन की बात आगामी कार्यक्रम या विषयावर शेखर लेले यांनी मार्गदर्शन केले.
योग प्रशिक्षण वर्गाने सांगता करण्यात आली. योग प्रशिक्षण शिबिरानंतर महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक भाजपा युवा नेते अनिकेत पटवर्धन यांनी या निवासी शिबिराबाबत मार्गदर्शन करताना झालेल्या सर्व कार्यक्रमाचे कौतुक केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी