जळगावात पैसे पडले सांगत रिक्षामधून रोकड लांबविली
जळगाव, 16 मार्च (हिं.स.) तुमचे पैसे पडले, असे पाठीमागुन येणाऱ्याने एका रिक्षा चालकाला सांगितले. चालकाने खाली पाहिले असता दहा आणि वीस रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. त्या उचलण्याचा प्रयत्न चालकाने केला असता पुढुन आलेल्या भामट्याने रिक्षामध्ये ४५ हजा
जळगावात पैसे पडले सांगत रिक्षामधून रोकड लांबविली


जळगाव, 16 मार्च (हिं.स.) तुमचे पैसे पडले, असे पाठीमागुन येणाऱ्याने एका रिक्षा चालकाला सांगितले. चालकाने खाली पाहिले असता दहा आणि वीस रुपयांच्या नोटा पडल्या होत्या. त्या उचलण्याचा प्रयत्न चालकाने केला असता पुढुन आलेल्या भामट्याने रिक्षामध्ये ४५ हजार रुपये ठेवलेली कापडी पिशवी घेत दोघे भामटे दुचाकीने पसार झाले. भामट्यांनी हा कारनामा नवीपेठेत एथर दुचाकी शोरुमजवळ रस्त्यावर केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शुभम प्रकाशचंद राठी (वय ३१, रा. गणपतीनगर, कुसुंबा खुर्द) हे रिक्षा चालवुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी घरुन एक लाख ५५ हजार रुपयांची रोकड एका कापडी पिशवीत ठेवली. ती घेऊन ते शहरात आले. नेहरु चौकातील आयडीबीआय बँकेत त्यांनी सीडीएममशीनव्दारे ५२ हजार ६०० रुपयांची रोकड भरणा केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राकडून हात उसनवारीने घेतलेली ४६ हजार ५०० रुपयांचा भरणा एचडीएफसी बँकेत त्यांनी केला. ४५ हजार रुपये ते अन्य बँकेत भरणा करणार होते. दोन बँकेत पैसे भरणा केल्यानंतर तिसऱ्या ठिकाणी नवीपेठेतील एथर दुचाकीसमोर चालक शुभम राठी आले. याठिकाणी दोन भामट्यांनी त्यांच्यावर डाव साधला. रिक्षा मागुन आलेला भामट्याने चालक राठी यांना आवाज देत म्हणाला, तुमचे पैसे खाली पडले. रिक्षा चालकाने खाली वाकुन पाहिले असता वीस आणि दहा रुपयांच्या नोटा खाली पडल्या होत्या. त्या नोटा खिशातून पडल्या, असे समजुन चालक वाकुन नोटा हातात जमा करू लागला. तेवढ्यात पुढे उभा असलेल्या साथीदाराने रिक्षाकडे येत रिक्षामधुन कापडी पिशवी शिताफीने काढली. त्यावर मागे असलेला भामटा दुचाकीवर बसुन फरार झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande