पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरार दस्तनोंदणी प्रलंबित
पुणे, 16 मार्च (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून सुमारे दोन हजारांहून अधिक सदनिकांमधील भाडेकरूंच्या भाडेकरारांची दस्तनोंदणी प्रलंबित आहेत. नोंदणी मुद्रांक विभागाकडून त्याला मान्यता मिळालेली नाही. नोकरदार वर्गाला समस्यांच
पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाडेकरार दस्तनोंदणी प्रलंबित


पुणे, 16 मार्च (हिं.स.)। पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून सुमारे दोन हजारांहून अधिक सदनिकांमधील भाडेकरूंच्या भाडेकरारांची दस्तनोंदणी प्रलंबित आहेत. नोंदणी मुद्रांक विभागाकडून त्याला मान्यता मिळालेली नाही. नोकरदार वर्गाला समस्यांचा सामना करण्याची वेळ आली आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाडेकराराच्या दस्ताची नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. नवीन व्यवसाय, उद्योगधंदा सुरू करण्यासाठी, सोसायटीत प्रवेश करण्यासाठी, वाहनचालक परवाना, वाहन खरेदी करण्यासाठी, बँक खाते, कर्ज काढण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणहक्क अधिनियम (आरटीई) प्रवेशासाठी, पासपोर्ट, प्राप्तिकर भरण्यासाठी, सरकारी कार्यालयात रहिवासी पत्ता पुरावा म्हणून नोंदणीकृत भाडे करारनामा ग््रााह्य असून, तो कायद्याने बंधनकारक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande