ऊस कामगारांसाठी योजनांची अंमलबजावणी होणार
बीड, 16 मार्च (हिं.स.)। आमदार सुरेश धस यांनी पुणे येथील सामाजिक न्याय भवनातील मध्यवर्ती कार्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा बीडच्या माजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेतली. यावेळी त्यां
ऊस कामगारांसाठी योजनांची अंमलबजावणी होणार


बीड, 16 मार्च (हिं.स.)।

आमदार सुरेश धस यांनी पुणे येथील सामाजिक न्याय भवनातील मध्यवर्ती कार्यालयात लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा बीडच्या माजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी ऊसतोडणी कामगारांच्या हितासाठी पथदर्शी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पुढील काळात आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन एमडी

मुधोळ यांनी दिले आहे.

मुधोळ यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे. यामुळे त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांबाबत आ.धस यांनी चर्चा केली. यावेळी आमदार धस यांनी २०२२ मध्ये राज्य शासनाने स्थापन केलेल्या ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ऊसतोडणी कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देणे, कामगारांच्या मुलांसाठी शैक्षणिक सुविधा व वसतिगृहांची

उपलब्धता, कामगारांना अपघाती विमा संरक्षण तसेच गळीत हंगामात बैलांच्या अपघाती मृत्यू अथवा जखमी झाल्यास देण्यात येणारे सानुग्रह अनुदान तातडीने मिळणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली.

ऊसतोडणी कामगार महिलांसाठी आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करून देणे, गर्भधारणेच्या काळात सकस आहाराची व्यवस्था करणे आणि गळीत हंगामात बांधकाम कामगारांच्या धर्तीवर मजुरांना सकाळी जेवणाचा डबा उपलब्ध करून देण्यासारख्या नाविन्यपूर्ण योजना राबवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. सेंट्रलाइज किचनच्या माध्यमातून सर्वं मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून ऊसतोडणी कामगारांच्या

हितासाठी पथदर्शी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पुढील काळात आवश्यक पावले उचलली जातील, असे आश्वासन दीपा मुधोळ यांनी दिले.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande