महिला महाराष्ट्र केसरी : २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।निर्झरा केअर फाउंडेशनतर्फे २८ व २९ मार्च रोजी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या मानाच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या महिला कुस्तीगिराला कार आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. त
gtedd


सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।निर्झरा केअर फाउंडेशनतर्फे २८ व २९ मार्च रोजी चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या मानाच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या महिला कुस्तीगिराला कार आणि मानाची गदा देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उपविजेत्या खेळाडूला बुलेट बक्षीस म्हणून मिळणार आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते रविवारी हरिभाई देवकरण प्रशालेत वासा पूजन आणि माती पूजन करून या स्पर्धेच्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले.

हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडणार आहे. निर्झरा केअर फाउंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी या स्पर्धेचे नियोजन केले आहे. सोलापूरच्या कुस्तीगिरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळावे आणि मुलींनी आपली ताकद सिद्ध करावी, हाच यामागचा उद्देश आहे, असे त्यांनी प्रास्ताविकात सांगितले.एखादी निवडणूक लढवण्याइतका खर्च करून स्वाती अळ्ळीमोरे या स्वतःच्या पदरमोडीतून ही स्पर्धा भरवत आहेत. आपण सर्वांनी या स्पर्धेला साथ दिली पाहिजे, असे आवाहन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande