सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। जुना विजापूर नाका ते ए.जी. पाटील कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून सर्व्हिस रोड केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंगळवारपासून दुसऱ्यांदा या रस्त्यावरील अ
सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त


सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। जुना विजापूर नाका ते ए.जी. पाटील कॉलेजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून सर्व्हिस रोड केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या माध्यमातून मंगळवारपासून दुसऱ्यांदा या रस्त्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे होणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी त्यासंदर्भातील आदेश काढले आहेत.सोलापूर-विजयपूर महामार्गावर सर्व्हिस रोड (डीपी रोड) मंजूर असून, ‘एनएचएआय’तर्फे त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ‘एनएचएआय’ने या रोडवरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात महापालिकेला पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर मे २०२५ मध्ये महापालिकेने सर्व्हे केला. त्यावेळी ९५ जणांची बांधकामे अनधिकृत असल्याची बाब समोर आली होती. त्यातील काही बांधकामे पोलिस बंदोबस्तात पाडण्यातही आली. परंतु काहींनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande