
नांदेड, 16 मार्च (हिं.स.) - केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योज योजनेच्या लाभासाठी प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी शासन प्रशासनाच्या संकल्पनेतुन पिंपरखेड ता. हदगांव येथे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागासह सर्व विभागातील अधिकारी कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीत पिंपरखेड महसूल मंडळातील राजकीय विविध क्षेत्रासह गावकरी परिसरातील मंडळीच्या उपस्थितीत मंडळ निहाय छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना महसूल विभागासह विविध विभागातील आवश्यक प्रमाणपत्रासह विविध लाभाचे वाटपही करण्यात आले. यावेळेस उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध योजनेसह या अभियानाच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शन करीत जनतेच्या हितासाठी असलेले समाधान शिबीर यशस्वीतेसाठी अधिकारी कर्मचारीवर्गाना आवश्यक त्या सूचना केल्या.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis