नांदेड - खरेदी विक्री संघाची निवडणूक २९ मार्चला
- एक जागा बिनविरोध, १२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात नांदेड, 16 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील उमरी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, १३ जागेसाठी ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील गण
नांदेड - खरेदी विक्री संघाची निवडणूक २९ मार्चला


- एक जागा बिनविरोध, १२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात

नांदेड, 16 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील उमरी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, १३ जागेसाठी ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातील गणेश अनेमवाड हे बिनविरोध निवडून आले तर उर्वरित १२ जागांसाठी २३ उमेदवारांनी अर्ज कायम ठेवले आहेत. खरेदी विक्री संघावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांत चुरस होण्याची शक्यता आहे.

खरेदी विक्री संघाच्या एकूण १३ जागा असून, तालुक्यातील सहकारी संस्था प्राधिकृत प्रतिनिधीसाठी ६ जागा, सर्वसाधारण २ जागा, महिला राखीव २ जागा, अनुसूचित जाती किंवा जमाती १ जागा, इतर मागासवर्गीय १ जागा, तर भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी १ जागा आहे. एकूण १३ जागांसाठी ४६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. एकूण २२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर उर्वरित २४ उमेदवारांपैकी १ जागा बिनविरोध घोषित झाल्याने,

२३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. २९ मार्च रोजी मतदान, मतमोजणी होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत एकूण १३ जागांसाठी ३१९ मतदार हक्क बजावतील त्यापैकी सहकारी संस्थेचे ५२ आणि वैयक्तिक मतदारसंघात २६७ मतदार आहेत.

यामध्ये सहकारी संस्था मधुन प्राधिकृत उमेदवार कदम आनंदा, कदम व्यकटराव, जाधव रामेश्वर, चंदेल वीरेंद्रसिंह, पवार रावसाहेब, जिरोणेकर नारायण, ढगे राजश्री, हिवराळे बाबुराव, आरसेवाड अंजनाबाई, गायकवाड दादाराव, मोरे अशोक, पवळे माधवराव, व्यक्तीगत सभासदांमधून सर्वसाधारणमध्ये पवार बालासाहेब, जाधव राघोजी, सरसे गणेशराव, सावंत मोहनराव, व्यक्तिगत महिला राखीवमधून ढगे कलावतीबाई, जाधव चंद्रकलाबाई, यल्लमगोडे ललिता, अनुसूचित जाती जमातीमधून सिरमोड लक्ष्मण, गोणेकर बालाजी, इतर मागासवर्गीयमधून आनेराये मारोती, पांचाळ मारोती हे रिंगणात आहेत.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande