
बीड, 16 मार्च (हिं.स.)।
महिलांची गर्भाशय पिशवी काढून टाकण्याचे प्रमाण मागच्या काही वर्षांत वाढले होते. विविध उपाय योजनानंतर यामध्ये कमालीची घट झाली आहे. आता शासनाच्या आरोग्य विभागाने राज्यस्तरीय समितीचे पुनर्गठण केले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालीही समिती नेमली आहे. राज्यस्तरीय समितीमध्ये आमदार नमिता मुंदडा, शिवसेनेच्या अॅड. संगीता चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे.
सरकारी किंवा खासगी दवाखान्यांमध्ये गर्भपिशवी काढण्याची (हिस्टरेक्टॉमी) शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा शल्यचित्सकांच्या समितीच्य
नमिता मुंदडा, शिवसेनच्या संगीता चव्हाण, अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील प्राध्यापक आणि स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभागाचे प्रमुख तसेच जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग व प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख यांचा समावेश आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis