शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळा – खासदार रविंद्र चव्हाण
नांदेड, 16 मार्च (हिं.स.)। डिजिटल युगात शेती करताना शेतकऱ्यांना आता जगातील इतर शेतकऱ्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन कसे वाढवता येईल आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक
Q


नांदेड, 16 मार्च (हिं.स.)।

डिजिटल युगात शेती करताना शेतकऱ्यांना आता जगातील इतर शेतकऱ्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यामुळे उत्पादन कसे वाढवता येईल आणि कमी खर्चात अधिक उत्पादन कसे मिळेल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे. तसेच आधुनिक शेतीसोबत शेतीपूरक व्यवसायाकडे वळल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे आवाहन खासदार रविंद्र चव्हाण यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, परदेशात वापरले जाणारे आधुनिक शेती तंत्रज्ञान तसेच विविध विषयांवरील चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रांचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार आहे. शेतकऱ्यांनी काळानुसार पीक पद्धतीत बदल करावा. ऊसाची उत्पादकता वाढविण्यासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा वापर करावा तसेच सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे. शेतीत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून उत्पादन वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande