पश्चिम आशियातील युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। युद्धाची धग गॅस सिलेंडरपासून चुलीपर्यंत पोचल्यानंतर आता शेतीच्या क्षेत्रातही खताची भाव वाढ होण्याची शक्यता समोर आली आहे. खत निर्मितीच्या कच्च्या मालाच्या आयातीमुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते असे मानले जात आहे. प्रामुख्य
पश्चिम आशियातील युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता


सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। युद्धाची धग गॅस सिलेंडरपासून चुलीपर्यंत पोचल्यानंतर आता शेतीच्या क्षेत्रातही खताची भाव वाढ होण्याची शक्यता समोर आली आहे. खत निर्मितीच्या कच्च्या मालाच्या आयातीमुळे ही स्थिती निर्माण होऊ शकते असे मानले जात आहे.

प्रामुख्याने युरिया व डीएपी ही दोन खते महत्त्वाची मानली जातात. सध्या या दोन्ही खतावर केंद्राने सबसिडी देऊन भाववाढीचा ताण येणार नाही अशी व्यवस्था केली आहे. मात्र या खताच्या निर्मितीसाठी अनेक घटक आयात करावे लागतात. आयात घटकांचे दर वाढत असताना त्याचा ताण दरवाढीत दिसू शकतो. त्यामुळे येत्या खरीप हंगामात खताचे भाव वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

आधीच शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहेत. लागवडीला जितका खर्च केला तितकाही पिके व धान्य विकून मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. हवामान बदल, अतिवृष्टी, महापूर यामुळेही यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई होण्यासाठी शेतकरी पीकविम्याच्याही प्रतीक्षेत आहेत. त्याची किती रक्कम आणि केव्हा पदरात पडेल याचीही शाश्वती नसताना आता युद्धामुळे खतांचे भाव वाढणार असल्याने हे शेतकऱ्यांवर नवे सुलतानी संकट मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande