
छत्रपती संभाजीनगर, 16 मार्च (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगर येथील व्यापारी महासंघाने महानगरपालिकेतील नवनिर्वाचित महापौर स्थायी समिती सभापती आणि नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन केले होते. मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत या सत्काराचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना दुग्धविकास मंत्री अतुल सावे म्हणाले की, शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधी आणि व्यापारी वर्ग यांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करत शहराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजीनगर व्यापारी महासंघाच्या वतीने आयोजित नवनिर्वाचित महापौर, स्थायी समिती सभापती आणि नगरसेवकांच्या सत्कार समारंभास भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis