वीज खंडित झाल्याने अंबाजोगाईत पाणीपुरवठा विस्कळीत
बीड, 16 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पंपहाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहराचे पाणी नियोजनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने कळंब येथील
वीज खंडित झाल्याने अंबाजोगाईत पाणीपुरवठा विस्कळीत


बीड, 16 मार्च (हिं.स.)। अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातील पंपहाऊसचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहराचे पाणी नियोजनाचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. सध्या उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढल्याने कळंब येथील १३२ केव्ही लाईनवर अतिरिक्त भार येत असून धनेगाव सबस्टेशन वारंवार ट्रिप होत आहे. या तांत्रिक बिघाडामुळे जलवाहिन्यांचे पंप वारंवार बंद पडत असून ६ दिवसांवर आलेला पाणीपुरवठा आता थेट ८ ते १० दिवसांवर गेला आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून आमदार नमिता मुंदडा सारूळ येथील १३२ केव्ही विद्युत केंद्राचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी महावितरणकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून सारूळ केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर आणि नवीन नळयोजना पूर्ण झाल्यावर हा प्रश्न कायमचा निकाली निघणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या प्रशासन परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande