
लातूर, 16 मार्च (हिं.स.)।
टॅम्पोत गळफास घेवून तरुणाची आत्महत्या
स्टेट्स ठेवून केली आत्महत्या औसा - लातूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना: औसा लातूर
-राष्ट्रीय महामार्गावर लिंबोळी खताच्या कारखान्याजवळ टेम्पो थांबवून टेम्पो मध्ये पाठीमागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटन झाल्याची माहिती समोर आली आहे.
सदर घटनेच्या अगोदर मोबाईलवर आत्महत्या करत असल्याचे रिल बनवले होते. स्वतः मालकीच्या टेम्पोत गुळी घेवून सोलापूरकडे जात असताना औसा-लातूर महामार्गावर लिंबोळी खताच्या कारखान्याजवळ टेंम्पो थांबवून पाठीमागील बाजूस गळफास घेऊन चालकाने आत्महत्या केली आहे. या घटनेतील मयत हा मुखेडजवळील रहिवासी आहे. पोलिसांनी सांगितले, मुखेड तालुक्यातील नांदगाव येथील गजानन मारवाडी (वय ३२) हा स्वतःच्या मालकीचा आयशर टेम्पो (क्र.एम एच २६ सी एच २१९२) मध्ये गुळी भरुन सोलापूर कडे जात होता. वाटेतच औशाजवळ त्याने टेम्पो बाजूला लावला. टेम्पोची साईड लाईट चालू करुन टेम्पोला बांधलेल्या दोरीने पाठीमागील बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केली.
मयत हा अविवाहित असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. वडिलांनी सात मुलीचे लग्न करुन एकुलता एक मुलाला मोठे करुन व्यवसायाला लावले. काही महिन्यांपूर्वी आयशर टेम्पो घेवून दिला. घटनास्थळी फौजदार भाऊसाहेब माळवदकर, बिट अमंलदार रामकृष्ण घुटे यांनी भेट देवून प्रेत शवविच्छेदनासाठी
शासकीय ग्रामीण रुग्णालयात आणले. गुळी भरून सोलापूरला जात असताना केली आत्महत्या मयत हा स्वतः चालक-मालक असून तो नेहमीप्रमाणे गुळी भरून सोलापूरकडे जात होता.
मात्र वाटेतच त्याने लातूर-औसा रोडवरील लिंबोळी खताच्या कारखान्याजवळ रस्त्याच्या बाजूला टेम्पो लावून पाठीमागच्या बाजूला असलेल्या दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. वयोवृद्ध आई-वडिलांचा आधार गेल्याने मोठे संकट कोसळले आहे. मुखेड तालुक्यातील नांदगाव येथील ३२ वर्षीय गजानन मारवाडी हा तरुणास सात बहिर्णीना हा एकुलता एक भाऊ होता. सातही बहिणींचे विवाह झाले आहेत. कुटुंबाची परिस्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis