साेलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बार्शीची सरशी
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांवर चर्चा सुरू आहे. पण आमदार व पालकमंत्री यांनी एका नावावर एकमत करून ते मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संधी न मिळालेल्या बार्शी तालुक्यास संधी
ZP news solpaur


सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)।

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांवर चर्चा सुरू आहे. पण आमदार व पालकमंत्री यांनी एका नावावर एकमत करून ते मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी पाठवले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संधी न मिळालेल्या बार्शी तालुक्यास संधी देणार आहे. दिलीप वैद्य यांचे नाव जवळपास अंतिम केल्याचे कळते.याबाबत १७ मार्च रोजी अध्यक्षपदाचे नाव जाहीर करण्यात येणार असून, धनगर समाजाला न्याय देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. माढा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील सदस्यांची नावे चर्चेत होती; पण अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला मिळालेले यश पाहता अध्यक्षपदाची संधी देण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून कळते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड १८ मार्च रोजी होणार आहे. अध्यक्षपद ओबीसी सर्वसासाधारणसाठी राखीव असून, अध्यक्षपदी महिला की पुरुष असणार याबाबत मात्र गोपनीयता ठेवण्यात आली आहे. भाजपकडून जातीय समीकरणे जुळवण्यासाठी धनगर समाजाला संधी देण्यात येणार आहे. सर्व आमदारांनी नावावर एकमत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले आहे. अध्यक्षाचे नाव खुद्द मुख्यमंत्री फडणवीस स्वत: १७ मार्च रोजी जाहीर करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande