लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत
सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही. आता ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्यांची ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे. आता योजने
लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत


सोलापूर, 16 मार्च (हिं.स.)। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना जानेवारीनंतर लाभ मिळालेला नाही. आता ज्यांची ‘ई-केवायसी’ चुकली त्यांची ३१ मार्चपर्यंत दुरुस्ती सुरू आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात योजनेसाठी तरतूदही झाली आहे. आता योजनेच्या निकषांनुसार पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींनाच नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १५ एप्रिलपूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे प्रत्येकी १५०० रुपये मिळणार आहेत.सोलापूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे सुरवातीला ११ लाख २० हजार ५६३ लाभार्थी होते. त्यानंतर निकषांनुसार लाभार्थींची पडताळणी झाली. त्यात केंद्र व राज्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी, पुरुष लाभार्थी, एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त लाभार्थी, कुटुंबात चारचाकी वाहने असलेल्या महिला, २१ वर्षांखालील व ६५ वर्षांवरील महिलांना अपात्र ठरविण्यात आले आहे. शेवटचा टप्पा म्हणून सर्वच महिला लाभार्थींना ‘ई-केवायसी’ करण्याचे बंधन घालण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande