अमरावतीत उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश लागू
अमरावती, 17 मार्च (हिं.स.) : अमरावती शहरात येत्या काळात विविध धार्मिक व सामाजिक जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार असल्याच्य पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश लागू केले आहेत. हे आद
उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात मनाई आदेश लागू  सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास कठोर कारवाई


अमरावती, 17 मार्च (हिं.स.) : अमरावती शहरात येत्या काळात विविध धार्मिक व सामाजिक जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होणार असल्याच्य पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश लागू केले आहेत. हे आदेश १७ मार्च रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २५ एप्रिल रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. अमरावती शहरात १९ मार्च रोजी गुडीपाडवा, २० मार्च रोजी संत झुलेलाल जयंती, २२ मार्च रोजी रमजान ईद, २६ मार्च रोजी श्रीराम नवमी, ३१ मार्च रोजी महावीर जयंती, २ एप्रिल रोजी हनुमान जयंती तसेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे उत्सव साजरे होणार आहेत. या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका, शोभायात्रा आणि धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (२) नसार अमरावती शहर पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी मनाई आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार मिरवणुका या किंवा आंदोलने दरम्यान आक्षेपार्ह घोषणाबाजी करणे, आक्षेपार्ह फलक किंवा बॅनर लावणे, धार्मिक भावना दुखावतील असे प्रदर्शन करणे तसेच सामाजिक सलोखा बिघडेल अशी कृत्ये करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर अफवा पसरवणे, समाजात तणाव निर्माण होईल अशा पोस्ट प्रसारित करणे, तसेच जीवितास किंवा सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण करणारी कृत्ये केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, सर्व धार्मिक सण व उत्सव शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे करण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी केले आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande