रत्नागिरीत गॅस एजन्सीत ५ व्यावसायिक सिलेंडरची अवैध विक्री
रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : येथील एका गॅस एजन्सीत गोडाऊन कीपरने पाच व्यावसायिक गॅस सिलेंडरची परस्पर अवैध विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित एजन्सीकडून जिल्हा प्रशासन तसेच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या
रत्नागिरीत गॅस एजन्सीत ५ व्यावसायिक सिलेंडरची अवैध विक्री


रत्नागिरी, 17 मार्च, (हिं. स.) : येथील एका गॅस एजन्सीत गोडाऊन कीपरने पाच व्यावसायिक गॅस सिलेंडरची परस्पर अवैध विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित एजन्सीकडून जिल्हा प्रशासन तसेच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून यापैकी चार सिलेंडर परत मिळवण्यात आले आहेत.

सध्या देशातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळित राहावा, यासाठी व्यावसायिक सिलेंडरच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सींना याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच व्यावसायिक सिलेंडर पुरवण्यास परवानगी आहे.

रत्नागिरी शहरातील संबंधित गॅस एजन्सीकडे २४ व्यावसायिक सिलेंडरचा साठा उपलब्ध होता. मात्र गोडावून कीपरने एजन्सी व्यवस्थापकांना कोणतीही माहिती न देता त्यापैकी पाच सिलिंडरची अवैध विक्री केल्याचे समोर आले. हा प्रकार लक्षात येताच एजन्सीकडून तातडीने कारवाई करण्यात आली आणि चार सिलेंडर परत मिळवण्यात यश आले.

या प्रकरणी एजन्सीच्या व्यवस्थापक प्रीती राज यांनी जिल्हा पुरवठा विभागाकडे तसेच शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande