
शिंदेंसह अनेक राजकीय नेत्यांचे सांगत होता भविष्य
नाशिक, 18 मार्च (हिं.स.)।
- अनेक राजकीय नेत्यांचा ज्योतिषी असलेल्या तसेच बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोप असलेल्या ज्योतिषाला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने आज पहाटे अटक केली आहे.
अशोककुमार एकनाथ खरात सर्फ कॅप्टन (वय ६७,९१, पार्नेट नं. ३७, तूप्त बाला कर्मयोगीनगर, तिड़के कॉलनी, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या ज्योतिषाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नोव्हेंबर २०२२ मध्ये पीडित ३५ वर्षीय विवाहित महिला मा भोंदू बाबाला कॅनडा कॉर्नरवरील ओकर प्रॉपर्टीज येथे भेटली होती. त्या ठिकाणी अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली पीडित महिलेचा विश्वास संपादन कैला. त्याने पीडितीला ओकश प्रॉपर्टीज येथे बोलावून तिच्या धार्मिक विश्वासाचा फायदा घेऊने तिला गुंगीकारक पदार्थ खायला आणि प्यायला दिले, नंतर तिला संमोहित करून तुझे आयुष्य बरबाद करून टाकेल अशी धमकी दिली आणि पतीला मरणाची भीती घालून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या तीन वर्षाच्या कालावधीत खरातने पीडितीवर वेळोवेळी अत्याचार केले. तीन वर्षांनतर पीडितीने त्याची भांडाफोड करून त्याच्याविरूद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने या नराधमाला आज बुधवारी पहाटे अटक केली. पोलिसांनी त्याच्या कार्यालयाची तपासणी केली असता नामांकित महिला आणि सेलिब्रिटी यांच्याशी संबंधित ५८ व्हिडिओ जप्त केले असून, त्याची तपासणी सुरू असल्याचे समजते. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे तो मर्चंट नेव्ही मधून निवृत्त झालेला आहे त्यानंतर तिने प्रसिद्ध अंकशास्त्र म्हणून ओळख मिळवली नोव्हेंबर 2022 मध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असणारे आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर घरात हा चर्चेत आला
अनेक बड़े राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचे खरे रूप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV