
अमरावती, 17 मार्च (हिं.स.) शहरातील मोबाईल चोरी व हरविल्याच्या प्रकरणांमध्ये गाडगेनगर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल १० लाख ४० हजार रुपयांचे ५३ मोबाईल फोन शोधून काढले असून ते संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले.गाडगेनगर पोलिस ठाण्यात मोबाईल हरविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हिँड्द्भूत्चा वापर करून मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत एकूण ५३ मोबाईल किंमत अंदाजे १० लाख ४० हजार रुपये शोधण्यात गाडगेनगर पोलिस स्टेशनच्या डी. बी. पथकाला यश आले.
सदर मोबाईल १६ मार्च २०२६ रोजी पोलिस स्टेशन येथे तक्रारदारांना परत देण्यात आले. यावेळी पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे, पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव तसेच दुय्यम पोलिस निरीक्षक विजया पंधरे व पोलिस कर्मचारी समाधान वाठोरे यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द करण्यात आले. हरविलेले मोबाईल सुरक्षितपणे परत मिळाल्याने तक्रारदारांनी गाडगेनगर पोलिसांचे आभार मानले.ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. राकेश ओला, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत डी. बी. पथक प्रमुख सपोनि मनोजकुमार मानकर, पोलिस अंमलदार अशोक वाटाने, प्रकाश मेश्राम, पोहेका निलेश जुनघरे, अमोल यादव, नपोका विनोद मालवे, पोशि सिद्धार्थ शुंगारे व सचिन गौरखेडे यांनी परिश्रम घेतले. हरविलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत देण्याच्या या कामगिरीमुळे गाडगेनगर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी