
अकोला, 18 मार्च (हिं.स.)। आदर्श गाव योजनेत निवडीसाठी जिल्ह्यातून पातूर तालुक्यातील खानापूरचा प्रस्ताव कृषी आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे.त्यासंबंधी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय झाला. आदर्श गाव योजनेबाबत बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली. प्र. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे, कृषी अधिकारी विलास वाशिमकर यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
आदर्श गाव योजनेत पातूर तालुक्यातील खानापूर येथील प्रस्ताव प्राप्त झाला. त्याबाबत सादरीकरण कृषी विभागातर्फे करण्यात आले. सेवाधर्म शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून कामे राबविण्यात येणार आहेत. योजनेत गावाची निवड कृषी आयुक्त स्तरावर होते. निवडीसाठी शिफारस जिल्ह्यातून करण्यात आली.योजनेबाबत जनजागृती करून अधिकाधिक गावांचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करावा, असे निर्देश देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे