
अकोला, 18 मार्च (हिं.स.)। सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता, साहित्य तसेच समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रेरणा फाउंडेशन च्या वतीने “भारत गौरव पुरस्कार 2026” जाहीर करण्यात आला असून या पुरस्कारासाठी समाजसेवक अनिल किसनराव शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
समाजाप्रती जागरूक राहून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.या संदर्भात फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्षा प्रेरणा कुलकर्णी यांनी पाठविलेल्या निवडपत्रात कळवून हा पुरस्कार वितरण सोहळा दि. 22 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अनिल शिंदे यांच्या निवडीबद्दल सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे