
रत्नागिरी, 18 मार्च, (हिं. स.) : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे प्रथमच क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या दि. २१ आणि २२ मार्च रोजी करण्यात आले आहे. शांतीनगर येथील शिवरुद्र टर्फवर ही स्पर्धा होईल.या लीगचे उद्घाटन शनिवारी (दि. २१ मार्च) सकाळी ९ नेरूळ (नवी मुंबई) येथील डी. वाय. पाटील क्रिकेट अॅकॅडमीचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी अविनाश गजानन साळवी यांच्या हस्ते होणार आहे.
स्पर्धेत पुरुषांचे २४ व महिलांचे ४ असे एकूण २८ संघ सहभागी झाले आहेत. या प्रीमियर लीग स्पर्धेला २४ संघमालकांचे प्रायोजकत्व लाभले आहे. रत्नागिरी शहराजवळील सुमारे दहा गावांतील क्षत्रिय मराठा खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, खेडशी, टिके आदी गावातील आणि शहरी विभागातील संघ आहेत. क्षत्रिय मराठा मंडळाने संघांची निवड करून प्रायोजित केले आहे.
स्पर्धेतील संघमालक व संघाची नावे अशी - कौमुदी बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स - कणाद वॉरियर्स, ओमेगा स्टेशनरी २.०- शिवभक्त मराठा, झाडगाव, आय.जी.एस- नवलाई नाचणे, सतीश साळवी-महालक्ष्मी खेडशी, कणाद कोचिंग क्लासेस-कालभैरव झाडगाव, नवलाई ग्रुप- जय शिवराय पाली, गुरुदत्त बागवे- स्वयंभू निरूळ, आशाताई साळवी- नवलाई-पावणाई, मिऱ्या, त्वमेय सप्लायर्स- जय भैरी म्हसोबा, जाकि-मिऱ्या, प्रतीक देसाई - जगदंब कासारवेली, वेदगंध ऍग्रो- मराठा वॉरियर्स, साई नगर, टेकनिर्माण इफ्रास्ट्रक्चर – जय भैरी, टेंभ्ये, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन- यंग बॉईज, निरूळ, सौ. विभावरी साळवी- नागेश्वर बागवाडी, श्रीमहालक्ष्मी कन्स्ट्रक्शन ऍण्ड सप्लायर्स-लक्ष्मीकेशव, फणसोप, हॉटेल आमंत्रण-लक्ष्मीकेशव, कसोप, राहुल बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्स- जय महाराष्ट्र, फणसवळे, नंदकिशोर चव्हाण- श्री गणेश, नाचणे, सुरेशराव सुर्वे - जय भैरी कुवारबाव, चिंतामणी एन्टरप्रायझेस- मराठा योद्धा, खेडशी, राजेंद्र घाग- मोरया स्पोर्टस, कारवांचीवाडी, सावंत एलिवेटर- नीलतारा, पेठकिल्ला, शिवार ऍग्रो टुरिझम- आरुष स्पोटर्स, खेडशी, क्षत्रिय मराठा मंडळ – तोरणा टायटन्स- महिला संघ, शिवनेरी-महिला संघ, रायगड रायडर्स- महिला संघ, रत्नदुर्ग वॉरियर्स- महिला संघ.
स्पर्धेमध्ये पुरुष विजेता संघाला रोख २५ हजार, उपविजेत्या संघाला रोख १५ हजार रुपये असे पारितोषिक व मॅन ऑफ द सिरीज विजेत्याला इलेक्ट्रिक बाइक बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. महिला संघातील वुमन ऑफ द सिरीज किताब विजेत्या महिलेचा पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. महिला विजेता व उपविजेता संघाला ट्रॉफी देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते होणार आहे. सर्व संघांना प्रोत्साहन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी