दिव्यांगांनी हयातीचा दाखला द्यावा, अन्यथा होणार लाभ खंडीत
अकोला, 20 मार्च (हिं.स.)। महानगरपालिकेच्या समाज कल्याण व विकास विभागाच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 31 मार्च 2026 पूर्वी हयातीचा दाखला आणि वचनपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हयातीचा दाखला
दिव्यांगांनी हयातीचा दाखला द्यावा, अन्यथा होणार लाभ खंडीत


अकोला, 20 मार्च (हिं.स.)।

महानगरपालिकेच्या समाज कल्याण व विकास विभागाच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी 31 मार्च 2026 पूर्वी हयातीचा दाखला आणि वचनपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हयातीचा दाखला सादर न केल्यास मार्च 2026 नंतर लाभ बंद होऊ शकतो, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ सुरू ठेवण्यासाठी हयातीचा दाखला आणि वचनपत्र आवश्यक असून, 40 टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या सुमारे 5,500 हजार लाभार्थ्यांना महापालिकेकडून दरमहा उदरनिर्वाह भत्ता दिला आहे. तसेच दिव्यांग विवाहासाठी एकवेळ अनुदानही दिले जाते. लाभार्थी किंवा त्यांच्या नातेवाइकांनी हयातीचे प्रमाणपत्र आणि वचनपत्र समाज कल्याण विभागात 31 मार्चपूर्वी सादर करावे. विलंब झाल्यास उदरनिर्वाह भत्ता थांबण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाने नागरिकांना वेळेत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande