आमदार अमोल मिटकरी यांचा गंभीर आरोप
अकोला, 20 मार्च (हिं.स.)। अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी त्यांचा बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत असतानाच अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणात अशोक खरात याची चौकशी कर
Photo


अकोला, 20 मार्च (हिं.स.)।

अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी त्यांचा बारामती आणि मुंबई येथील घराबाहेर जादूटोण्याशी संबंधित वस्तू सापडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत असतानाच अमोल मिटकरी यांनीही या प्रकरणात अशोक खरात याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे, दरम्यान अमोल मिटकरी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मिटकरी यांनी, 18, 19 आणि नोव्हेंबर या दिवशी अनुक्रमे शिवरात्री, व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी बाहेर जादूटोणा सदृश्य प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या का असा सवाल ही त्यांनी केला आहे.. शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते.अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणात अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा 28 ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता? या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. असेही मिटकरी यांनी म्हटलं आहे.. तर मिटकरी यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून चौकशीची मागणीही केली आहे..

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande