छ. संभाजीनगर: शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराजस्व समाधान शिबिर
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च 2026 (हिं.स.) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत सर्व विभागांनी पुढाकार घेावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य आणि राज्यस्तरी
अ


छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च 2026 (हिं.स.) : सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत सर्व विभागांनी पुढाकार घेावा, असे आवाहन विधान परिषद सदस्य आणि राज्यस्तरीय समिती सदस्य संजय केनेकर यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला गेला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जिल्ह्यातील शिबिराचे नियोजन आणि अंमलबजावणी याबाबत माहिती सादर केली. बैठकेंमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, कन्नड उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच सर्व तहसीलदार व उपविभागीय अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

समाधान शिबिर अंतर्गत नागरिकांना सातबारा वितरण, सेतू सुविधा केंद्रातून विविध दाखले आणि प्रमाणपत्र, डिजिटल सातबारा, पानंद रस्ते, कृषी विभागांतर्गत शेती अवजारांचे वाटप, आरोग्य विभागाच्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड, एसटी बसेसचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड आणि इतर शासकीय योजनांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे वितरित केली जातात.

शिबिर आयोजित होणार असलेल्या ठिकाणांबाबत ग्रामस्तरावर जाणीव जागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील काम प्रगतीपथावर असून, प्रशासनाचे अभिनंदन विधान परिषद सदस्य केनेकर यांनी केले. त्यांनी सर्व विभागांच्या योजनांचा लाभ नागरिकांना तत्काळ आणि लोकाभिमुख पद्धतीने मिळावा, तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर शिबिर यशस्वीपणे राबवावे, असे निर्देश दिले.

आजपर्यंत ८४ शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये २३६० प्रकरणांची निकाली, ३१०२ प्रमाणपत्रांचे वितरण, २२५८ आठ अ उतार प्रमाणपत्रांचे वितरण, २५९० डिजिटल सातबारा वितरण, ३८९ सातबारा दुरुस्त, १४ गाव दप्तर अद्यावत करणे आणि १९ आकर्षक परवाने वितरण केले गेले आहेत.

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande