
नांदेड, 20 मार्च (हिं.स.) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयमार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम व स्वच्छता अभियानाबाबत जनजागृतीसाठी लेखन या क्षेत्रातील पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविण्याचा मूळ अंतिम दिनांक 15 मार्च 2026 होता; मात्र आता ही मुदत वाढवून 31 मार्च 2026 केली आहे. स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत प्रकाशित झालेल्या लेखन, छायाचित्रे व वृत्तकथा स्वीकारल्या जात आहेत.
राज्यातील विविध भागातील स्पर्धकांना त्यांच्या संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रवेशिका प्राप्त करता येतील, तर मुंबई शहर व उपनगरातील स्पर्धकांसाठी अर्ज माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथे उपलब्ध आहेत.
अर्जाचे नमुने https://dgipr.maharashtra.gov.in/
या संकेतस्थळावरूनही डाउनलोड करता येतील.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis