कॅप्टन अशोक थोरातचा भांडाफोड त्याच्याच कर्मचाऱ्यांनी केला
नाशिक, 20 मार्च (हिं.स.)। बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अंकशास्त्र स्वामी कॅप्टन अशोक थोरात यांचा भांडाफोड हा त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे यापूर्वी या कर्मचाऱ्यावरती देखील एक गुन्हा दाखल असून त्याला आज शु
SIT formed in rape case


नाशिक, 20 मार्च (हिं.स.)।

बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अंकशास्त्र स्वामी कॅप्टन अशोक थोरात यांचा भांडाफोड हा त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे यापूर्वी या कर्मचाऱ्यावरती देखील एक गुन्हा दाखल असून त्याला आज शुक्रवारी पोलीसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे.. दरम्यान या सगळ्या प्रकरणावरती आता राजकीय आरोप प्रत्यारोप गतिमान झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले आहे.

स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणारा आणि राजकीय ज्योतिषी म्हणून मिरवणारा येथील अशोक खरात याला नाशिक गुन्हेशाखा युनिट-1 ने बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात बुधवारी (दि. 18) अटक केली.गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून या भोंदूने नाशिक शहर, तसेच इतरत्र बड्या लोकांना भविष्य वर्तविण्याचा बहाणा करून, त्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारे शोषण केल्याची नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात आली असून तपास गतिमान होत आहे

सर्व प्रकरणी आता घडामोडी देखील वाढल्या असून ही सर्व बाब समोर आणण्यामध्ये खरात यांच्या कार्यालयात काम करत असलेल्या एका शिपाई धीरज जाधव ने त्याचा भांडाफोड केला आहे यापूर्वी या शिपायावर एक गुन्हा दाखल असून त्याच्यावर ती पोलिस आता चौकशी करत असून त्यालाही शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत खरात याच्या घरात दोन लॅपटॉप सापडले असून त्यामधून अजून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे एसआयटी स्थापन केलेल्या प्रमुख तेजस्विनी सातपुते या नाशकात दाखल झाले असून त्यांनी खरात यांची दोन तास चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तर दुसरीकडे या सर्व प्रकरणी राजकीय हालचाली देखील गतिमान झाले असून या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे नाव समोर आल्यानंतर होत असलेल्या वेगवेगळ्या आरोपामुळे पक्षाची बदनामी होत असून या सर्व प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची एक बैठक होणार असून त्या बैठकीत रूपाली चाकणकर यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. लवकरच याप्रकरणी अजून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande