चंद्रपूर : अपघातात वन्यजीवांचा जीव जात असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
चंद्रपूर, 20 मार्च (हिं.स.)। अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्यजीवांचा जीव जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जुनोना जंगलात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून आले आहे. १३ दिवसापूर्वी जुनोना - चिचपल्ली रस्त्यावर एका बिबट्याचा मृत्यू झ
चंद्रपूर : अपघातात वन्यजीवांचा जीव जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर


चंद्रपूर, 20 मार्च (हिं.स.)। अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्यजीवांचा जीव जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. जुनोना जंगलात अपघाताचे सत्र थांबता थांबत नसल्याचे दिसून आले आहे. १३ दिवसापूर्वी जुनोना - चिचपल्ली रस्त्यावर एका बिबट्याचा मृत्यू झाला होता, आता पुन्हा गुरुवारी पहाटे १ च्या सुमारास याच रस्त्यावर एका मोठ्या नर चितळाला अज्ञात वाहनाच्या धडकेत जीव गमवावा लागला असल्याचे समोर आले आहे.

वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगलातून 'हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी' चे सदस्य शाहबाज शेख,नौशाद सय्यद हे गिलबिली येथे कामानिमित्या जात असतांना, पहाटे दोनच्या सुमारास एक नर चितळ मृतावस्थेत आढळला. गाडी थांबवून शहानिशा केली असता, अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. घटनेची माहिती संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे यांना देण्यात आली व वनविकास महामंडळाचे अधिकाऱ्यांना देण्यात आली. लगेच घटनास्थळ गाठून चितळाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला.

या रस्त्याच्या रुंदीला 'हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी' ने विरोध केला होता, कारण जुनोना जंगल हे एका महत्वाच्या भ्रमणमार्गात येत असून भरपूर प्रमाणात वन्यजीवांची हालचाल आपल्याला बघावयास मिळते. रस्त्याची रुंदी वाढविल्याने वाहनाचा वेग वाढेल, परिणामी वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तेव्हा रस्त्याचे रुंदीकरण वाढवणार असाल तर, वेगावर नियंत्रणसाठी उपाययोजना म्हणून 'स्पीड ब्रेकर' अथवा 'बॉक्स कलवर्ट' ची निर्मिती करण्यात यावी, संध्याकाळी ६ नंतर हा रस्ता बंद करण्यात यावा हे सुचविण्यात आले होते, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे फक्त तोंडी आश्वासन देऊन रस्त्याचे रुंदीकरण मोठ्या जोमात करण्यात आले, आता त्याचे परिणाम वन्यजीवांना भोगावे लागत असल्याचा आरोप 'हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी' चे दिनेश खाटे यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande