
लातूर, 20 मार्च (हिं.स.)। विविध कार्यकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी सहकार खातं पुढाकार घेत असून त्याचाच एक भाग म्हणून किनगाव सोसायटीच्या माध्यमातून सहाशे मेट्रिक ट्रनच्या गोडाऊनचा भूमिपूजन आज आपण केलं असून यापुढेही सोसायट्यांना सक्षम होण्यासाठी अनेक उपक्रम हाती घ्यावेत असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना . बाबासाहेब पाटील यांनी किनगाव येथे केले.
ते अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण प्रकल्प योजनेअंतर्गत किनगावच्या सोसायटीमार्फत 600 मेट्रिक ट्रनच्या बांधकाम भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भास्कर मुंडे होते . व्यासपीठावर माजी जिल्हा परिषदेचे त्र्यंबक गुट्टे, अशोक केंद्रे , माजी सरपंच किशोर मुंडे, त्र्यंबक लव्हराळे, विठ्ठल बोडके , भागवत गुट्टे, अश्विन नगराळे, संग्राम चामे , बालाजी कातकडे, हरिश्चंद्र हरिदास, माणिक डोके, नारायण देशमुख, सुनील वाहुळे, माऊली बोडके, बाळू फड, नितीन पाटील सह विविध मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सहकार मंत्री नामदार पाटील म्हणाले की गोडाऊनचे बांधकाम आपण चांगल्या दर्जाची करा यामधील शेतकऱ्यांना माल तारण करून कर्ज देण्याची व्यवस्था विविध बँकेच्या माध्यमातून आपण करू आणि शेतकऱ्यांना आणि सोसायटीना सक्षम करण्यासाठी सहकार खातं कायम कटिबद्ध असून आगामी काळात किनगावच्या सोसायटीने विविध व्यवसायात प्रवेश करून सोसायटीला आर्थिक सक्षम बनवावे असे सुद्धा सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis