परभणीत ऑटो व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ’ स्थापन
परभणी, 20 मार्च (हिं.स.) : राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या माध्यमातून चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विव
परभणीत ऑटो व मिटर्ड टॅक्सी चालकांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळ’ स्थापन


परभणी, 20 मार्च (हिं.स.) : राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या माध्यमातून चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातील.

मंडळाद्वारे उपलब्ध असलेल्या सुविधांमध्ये जीवन विमा, अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य, चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्यवृद्धी प्रशिक्षण आणि 65 वर्षांवरील परवानाधारकांसाठी निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत सानुग्रह अनुदान यांचा समावेश आहे.

याशिवाय, नवीन ऑटो रिक्षा किंवा मिटर्ड टॅक्सी खरेदी तसेच गृहखरेदीसाठी कर्ज सुविधा आणि राज्यस्तरीय मंडळाने मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजनाही या मंडळात उपलब्ध आहेत.या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित चालकांनी मंडळाचे सभासद होणे आवश्यक आहे. सभासद नोंदणीसाठी संकेतस्थळ https://ananddighekalyankarimandal.org वर जाऊन नोंदणी करता येईल. नोंदणी शुल्क रुपये 500 आणि वार्षिक सभासद शुल्क रुपये 300 निश्चित करण्यात आले आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशिष पाराशर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande