छ. संभाजीनगरात नौदलातील आजी- माजी सैनिकांचा २४ रोजी मेळावा
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च (हिं.स.)। भारतीय नौदलातील आजी-माजी सैनिक व त्यांचे अवलंबित यांचा मेळावा मंगळवार २४ रोजी सकाळी ११ वा. आयोजीत करण्यात आला आहे. हा मेळावा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. यामेळाव्यात
छ. संभाजीनगरात नौदलातील आजी- माजी सैनिकांचा २४ रोजी मेळावा


छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च (हिं.स.)। भारतीय नौदलातील आजी-माजी सैनिक व त्यांचे अवलंबित यांचा मेळावा मंगळवार २४ रोजी सकाळी ११ वा. आयोजीत करण्यात आला आहे. हा मेळावा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे. यामेळाव्यात नौदल मुख्यालय, मुंबई येथून अधिकारी- कर्मचारी उपस्थित राहणार असून आजी व माजी सैनिकांच्या विविध अडचणी, पेन्शन, जन्म तारीख बदल, नावात बदल इ. येणाऱ्या अडचणीसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.तरी नौदलात कार्यरत वा सेवानिवृत्त माजी सैनिकांनी व त्यांच्या अवलंबितांनी आपल्या अर्जासह, आवश्यक कागदपत्रांच्या दोन प्रतिंसह उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande