नाशिक - महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चांगली संधी - पर्यटन उपसंचालक डॉ. राऊत
नाशिक, 20 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक मोठा वारसा आहे. प्राचीन परंपरा असलेल्या पर्यटन स्थळांचे चांगल्या प्रकारे जतन व संवर्धन केलेले आहे. ही पर्यटन स्थळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्यटन संस्थांचे
नाशिक - महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चांगली संधी - पर्यटन उपसंचालक डॉ. राऊत


नाशिक, 20 मार्च (हिं.स.)। महाराष्ट्राला ऐतिहासिक, सांस्कृतिक व भौगोलिक मोठा वारसा आहे. प्राचीन परंपरा असलेल्या पर्यटन स्थळांचे चांगल्या प्रकारे जतन व संवर्धन केलेले आहे. ही पर्यटन स्थळ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध पर्यटन संस्थांचे महत्वपूर्ण योगदान असल्याने महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी असल्याचे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत यांनी व्यक्त केले.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संस्कृती हॉलिडेज या पर्यटन संस्थेचा शुभारंभ डॉ.नंदकुमार राऊत यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते, कार्यक्रमास हॅपी व्हेकेशनचे संचालक दत्ता भालेराव, माहिती विभागाचे माजी संचालक शिवाजी मानकर उपस्थित होते.

हॅपी व्हेकेशन चे संचालक दत्ता भालेराव यावेळी बोलताना म्हणाले की, आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा हा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा महोत्सव भारतभरात विविध ठिकाणी होत आहे, त्यामुळे जास्तीत जास्त पर्यटन सुविधा पर्यटकांना देण्यासाठी पर्यटन संस्थांवर मोठी जबाबदारी आहे हे काम करण्यासाठी शासन व पर्यटन क्षेत्रातील व्यक्तींनी एकत्र येऊन नियोजन केल्यास निश्चितच फायदेशीर होईल.यावेळी संस्कृती हॉलिडे चे संचालक नितीन चिंतामणी, श्रीमती यमुना अधिकारी, राजवीर मानकर, संस्कृती मल्टीमीडियाच्या संचालिका अमृता चौव्हाण, सुरज लोधी संस्कृतीचे व्यवस्थापक बी. बी. खैरनार, मुकेश पाटील, सौ. करूणा पाटेकर, सौ. सुनिता शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande