सावंगा विठोबा येथे भक्तांची अलोट गर्दी, 72 फूट उंच झेंड्यांवर चढवण्यात आली खोळ
अमरावती, 20 मार्च (हिं.स.) : तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा-रामनवमी यात्रा महोत्सवाला १८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. आज (दि. १९) गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ७२ फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढवण्
सावंगा विठोबा येथे भक्तांची अलोट गर्दी, 72 फूट उंच झेंड्यांवर चढवण्यात आली खोळ:थरारक सोहळा मुख्य आकर्षण


अमरावती, 20 मार्च (हिं.स.) : तालुक्यातील श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा-रामनवमी यात्रा महोत्सवाला १८ मार्चपासून सुरुवात झाली आहे. आज (दि. १९) गुरुवारी गुढीपाडव्याच्या दिवशी लाखो भाविकांच्या उपस्थितीत ७२ फूट उंच झेंड्यांना नवीन खोळ चढवण्याचा पारंपरिक व थरारक सोहळा यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. सावंगा विठोबा येथे श्री अवधुत महाराज (श्री कृष्णाजी महाराज) यांचे मंदीर आहे. येथील ही यात्रा २७ मार्चपर्यंत चालणार आहे. देव व भक्त या समानतेचे प्रतीक ७२ फूट झेंड्यांना खोळ चढविण्याचा हा चित्तथरारक सोहळा गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी ४ वाजता सुरू झाला. संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर यांच्या हस्ते महाराजांच्या समाधीचे विधीवत पूजन करून दोन्ही झेंड्यांना नवीन खोळ (कापड) चढविण्यात आली आहे. झेंड्यांना पायाचा स्पर्श होऊ नये म्हणून दोरांच्या सहाय्याने झेंड्यांची जुनी खोळ काढून नवीन खोळ चढवली आहे. अखंड कापूर ज्योती, बासन (टाळ), ढोलकी (मृदंग)चा गजर, लाखोंच्या-हजारोंच्या संख्येने सांवगा विठोबा नगरीत आलेल्या अवधूत भजन मंडळाच्या मांडीचे सुमधुर गायनात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला.

गुढी पाडव्याच्या निमित्त सायंकाळी ५ वाजता मंदिरात चंदन-उटी व रमणा कार्यक्रम घेण्यात आला. या दिवशी यात्रेत बाहेरगावाहून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी संस्थानची अन्नदान समिती आणि सेवाभावी मंडळाच्यावतीने प्रसाद (अन्नदान) व्यवस्था करण्यात येते .

कापूर जाळण्याची परंपरा

सावंगा विठोबा येथे श्री अवधुत महाराज (श्री कृष्णाजी महाराज) यांच्या मंदीरात येणाऱ्या प्रत्येक भाविक कापूर जाळतो. या ठिकाणी कापूर जाळ्ण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी अनेक व्किंटल कापूर भाविकांकडून जाळला जातो, त्याचप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात कापूर जाळण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande