
सोलापूर, 20 मार्च, (हिं.स.)। मराठा समाज हा राज्यकर्ता समाज असून, या समाजाने आजपर्यंत सर्व समाजाला सामावून घेत मोठ्या भावाची भूमिका पार पाडली आहे. मराठा समाजासाठी मराठा भवन, मराठा मुलींचे वसतिगृह बांधू, काही अडचणी आल्यास कायदा, नियम बदलू पण मराठा समाजाचे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.सकल मराठा समाज प्रबोधन प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित मराठा समाजातील १५ नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, माऊली पवार, गणेश देशमुख, नीलकंठ वाघचौरे, शरद ठाकरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सुनील केदार यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी नूतन नगरसेवक अमित जाधव, मृण्मयी गवळी, गणेश वानकर, विनोद भोसले, कल्पना कदम, ज्ञानेश्वरी देवकर, वैशाली भोपळे, वृषाली चालुक्य आदींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड