रायगड: नागावमधील स्विमिंग पूलमध्ये बालकाचा मृत्यू
रायगड, 20 मार्च 2026 (हिं.स.) : आनंदाच्या सहलीत क्षणात दु:खाचे सावट ओढवणारी घटना नागावमध्ये घडली. सहा वर्षांचा रिशांक पाटील मित्राच्या खासगी स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. माहितीनुसार, रोहित चंद्
Nagaon shaken! Tragic death of a six-year-old child in a swimming pool


रायगड, 20 मार्च 2026 (हिं.स.) : आनंदाच्या सहलीत क्षणात दु:खाचे सावट ओढवणारी घटना नागावमध्ये घडली. सहा वर्षांचा रिशांक पाटील मित्राच्या खासगी स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, रोहित चंद्रकांत पाटील (वय ३२, रा. आंबेपूर मल्याण, ता. अलिबाग) पत्नी अस्मिता, मुलगा रिशांक आणि नातेवाईकांसह नागाव येथे सहलीसाठी गेले होते. सुरुवातीला सर्वजण पूलमध्ये आनंद घेत होते. काही वेळानंतर कपडे बदलण्यासाठी खोलीत गेले, आणि या वेळी रिशांक काही क्षणांसाठी बाहेर थांबला.

कुटुंबीयांनी काही मिनिटांनी त्याचा शोध घेतला असता, तो कुठेच आढळला नाही. अखेर त्याला पूलच्या तळाशी बुडालेल्या अवस्थेत आढळले. तातडीने जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सायंकाळी सव्वा चार वाजताच्या सुमारास त्याला मृत घोषित केले.

ही घटना नागाव परिसरासाठी धक्कादायक ठरली असून, निष्पाप चिमुकल्याच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेतून स्पष्ट झाले की स्विमिंग पूलसारख्या ठिकाणी लहान मुलांवर क्षणभरही दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande