
सोलापूर, 20 मार्च (हिं.स.)।
मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते राम जाधव यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवत कार्यक्रम उधळण्याचा इशारा देत संयोजक माऊली पवार यांच्या विरोधातही तीव्र भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क झाले होते. संभाव्य कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून राम जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच नजरकैदेत ठेवण्यात आले.सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजातील नगरसेवकांचा सत्कार सोहळा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते आयोजित केला होता. मात्र, सोलापूरचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असताना ते ओबीसी समाजाला दिल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अनेक दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जबाबदार धरत आंदोलन केले जात आहे. त्यांचा एक भाग म्हणून पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा सत्कार सोहळा उधळून लावत काळे झेंडे दाखवण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राम जाधव यांनी दिला होता.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड