
पुणे, 20 मार्च (हिं.स.)।पिंपळे सौदागर परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत कळीचा मानला जाणारा, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून विविध तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे प्रलंबित असलेला १८ मी. 'ट्रायोज-झूलेलाल टॉवर' रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे,नगरसेविका अनिताताई काटे आणि नगरसेविका कुंदाताई भिसे यांच्या अथक परिश्रमातून आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रस्त्याचे काम आज प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. पिंपळे सौदागरच्या मध्यवर्ती भागातून जाणारा हा रस्ता अनेक गृहप्रकल्पांना जोडणारा मुख्य दुवा आहे. मात्र, जमिनीचे अधिग्रहण, तांत्रिक त्रुटी आणि इतर काही कारणांमुळे या १८ मी रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम प्रलंबित होते.रस्ता अर्धवट असल्याने नागरिकांना धुळीचा त्रास आणि वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडवण्यासाठी श्री शत्रुघ्न काटे यांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार बैठका घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून सर्व अडथळे दूर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु