लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरतीची ३० उमेदवारांची तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी जाहीर
लातूर, 20 मार्च (हिं.स. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन २०२४–२०२५ अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय ३० उमेदवारांची तात्पुरती (Provisional) निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे. सदर यादी लातूर जिल
पोलीस भरती यादी


लातूर, 20 मार्च (हिं.स. लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती सन २०२४–२०२५ अंतर्गत गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय ३० उमेदवारांची तात्पुरती (Provisional) निवड यादी तसेच प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे. सदर यादी लातूर जिल्हा पोलीस दलाच्या अधिकृत संकेतस्थळ https://laturpolice.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचण्या, लेखी परीक्षा व इतर सर्व टप्पे अत्यंत काटेकोरपणे, पारदर्शक पद्धतीने व नियमानुसार पार पाडण्यात आले. मा. पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण प्रक्रिया सुयोग्य नियोजन, प्रभावी अंमलबजावणी व वेळेचे अचूक व्यवस्थापन यामुळे अल्पावधीत पूर्ण करण्यात आली.

विशेष म्हणजे, राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत लातूर जिल्हा पोलीस दलाने सर्वप्रथम तात्पुरती निवड यादी जाहीर करण्याचा मान मिळविला आहे. ही बाब लातूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे, पारदर्शकतेचे व उत्तरदायित्वाचे द्योतक आहे.

गुढीपाडवा व रमजान ईद या सणांच्या पूर्वसंध्येला ही निवड यादी जाहीर झाल्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांसाठी हा क्षण अत्यंत आनंददायी व त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरत आहे. दीर्घ काळ मेहनत घेऊन स्पर्धात्मक प्रक्रियेत यश मिळवलेल्या उमेदवारांच्या कुटुंबीयांमध्ये देखील समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर निवड ही तात्पुरती (Provisional) असून पुढील कागदपत्र पडताळणी व आवश्यक शासकीय प्रक्रियांच्या अधीन राहील. उमेदवारांनी पुढील सूचनांसाठी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

लातूर जिल्हा पोलीस दलाने राबविलेली ही भरती प्रक्रिया राज्यातील इतर जिल्ह्यांसाठी एक आदर्श नमुना ठरत असून, नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल विश्वास व सकारात्मकता निर्माण करणारी ठरली आहे.

----------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande