पुणे - जिल्ह्यातील ३८ हजार सातबारा उताऱ्यांच्या नोंदीत बदल
पुणे, 20 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील ३८ हजार सातबाऱ्यांच्या नोंदी सातबारा शुद्धीलेखन दुरुस्तीच्या नावाखाली बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये १५ अधिकाऱ्यांवर अतिगंभीर, ८२ गंभीर आणि ५५ अधिकाऱ्यांवर मध्यम स्वरुपाच्या अनियमितेचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम
पुणे - जिल्ह्यातील ३८ हजार सातबारा उताऱ्यांच्या नोंदीत बदल


पुणे, 20 मार्च (हिं.स.)। जिल्ह्यातील ३८ हजार सातबाऱ्यांच्या नोंदी सातबारा शुद्धीलेखन दुरुस्तीच्या नावाखाली बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये १५ अधिकाऱ्यांवर अतिगंभीर, ८२ गंभीर आणि ५५ अधिकाऱ्यांवर मध्यम स्वरुपाच्या अनियमितेचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, मंडल अधिकाऱ्यांवर लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील सातबारा उताऱ्यांचे भूमी अभिलेख विभागाकडून संगणकीकरण करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. सातबारा उताऱ्यामध्ये यापूर्वी झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यामध्ये सातबारा उताऱ्यातील नावे चुकविणे, क्षेत्र चुकविणे, नवीन शर्तीचे शेरे, कूळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, वारसाच्या नोंदी वैध आणि कायदेशीर नोंदी दुरुस्त करण्यात आले आहेत.या संदर्भात पुणे विभागीय आय़ुक्तांकडून येत्या काही दिवसांत ॲक्शन टेकन रिपोर्ट मागविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सदोष आढळलेले सर्व फेरफार कलम २५७ नुसार पुनर्रीक्षण घेऊन ते दुरुस्त करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande