कुटुंबांना मिळणार रॉकेल; ग्रामीण भागासाठी निर्णय
सोलापूर, 20 मार्च, (हिं.स.)। सध्या शहरातील कुटुंबांना गॅस सिलेंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची तर ग्रामीणमधील कुटुंबांना ४५ दिवसांची मर्यादा घालण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना रॉकेल दिले जाणार आहे. सोला
कुटुंबांना मिळणार रॉकेल; ग्रामीण भागासाठी निर्णय


सोलापूर, 20 मार्च, (हिं.स.)। सध्या शहरातील कुटुंबांना गॅस सिलेंडर बुकिंगसाठी २५ दिवसांची तर ग्रामीणमधील कुटुंबांना ४५ दिवसांची मर्यादा घालण्यात आली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे अंत्योदय व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना रॉकेल दिले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने जिल्ह्यात साडेचार लाख लाभार्थी अंत्योदय व प्राधान्यक्रमातील असल्याची माहिती शासनाला कळविली आहे.

सोलापूर शहर-जिल्ह्यातील हजारो कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच्या नावे एकापेक्षा जास्त गॅस कनेक्शन आहेत. अनेकांनी आपल्या कनेक्शनवर वेगवेगळ्या कंपन्यांचे गॅस सिलेंडर घरात आणून ठेवले आहेत. दुसरीकडे गॅस सिलेंडरची मागणी वाढली आहे, पण त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे बुकिंग करण्याचे दिवस वाढवावे लागले आहेत. एकाच घरात राहणाऱ्या अनेक कुटुंबाकडे किमान गॅस दोन कंपन्यांंचे कनेक्शन आहेत. त्यांनी भविष्यात चिंता नको म्हणून दोन्हीकडे बुकिंग करून सिलेंडर मिळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande