प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाच्या विभागीय स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन माहिती भरण्यास मुदत वाढ
छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च (हिं.स.) । राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी आयोजित “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” चे ऑनलाईन आयोजन 3
प्राथमिक शिक्षकांसाठी केंद्रप्रमुख पदाच्या विभागीय स्पर्धा परीक्षेची ऑनलाईन माहिती भरण्यास मुदत वाढ


छत्रपती संभाजीनगर, 20 मार्च (हिं.स.) । राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर नियुक्ती देण्यासाठी आयोजित “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2025” चे ऑनलाईन आयोजन 3 व 4 फेब्रुवारी 2026 रोजी तीन सत्रांमध्ये करण्यात आले होते.

या परीक्षेस एकूण 46,068 परीक्षार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते, त्यापैकी 38,559 परीक्षार्थी प्रत्यक्ष परीक्षेस उपस्थित होते. परीक्षेचा निकाल 13 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर (www.mscepune.in

) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सदर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) किंवा CTET उत्तीर्ण असल्यास त्याबाबतची माहिती पूर्वी 16 ते 21 मार्च 2026 पर्यंत भरावी अशी मुदत देण्यात आली होती. मात्र, उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या विनंत्यांनुसार ही मुदत वाढवून आता 22 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 पर्यंत करण्यात आली आहे.

ही माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. उमेदवार पुढील लिंकवर माहिती भरू शकतात: https://mscepune.in/dredola/KP२०२६Info.aspx

.---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande