
मुंबई, 20 मार्च (हिं.स.) - मध्य रेल्वे, मुंबई विभाग, १५ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्याच्या उद्देशाने, ठाणे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ३ व ४ आणि डोंबिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ए, १ व २ यांच्या विस्तारासाठी, दिनांक २१/२२.०३.२०२६ रोजी (शनिवार/रविवारच्या मध्यरात्रीपासून ते रविवारच्या सकाळपर्यंत) एक विशेष 'ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक' परिचालीत करणार आहे.
ब्लॉकचा दिनांक : २१/२२.०३.२०२६ (शनिवार/रविवार मध्यरात्रीपासून ते रविवार सकाळपर्यंत)
ब्लॉकचा कालावधी : दिनांक २२.०३.२०२६ रोजी ००.०० वाजल्यापासून १०.०० वाजेपर्यंत
ब्लॉकचा विभाग : मुलुंड ते ठाणे आणि दिवा ते डोंबिवली (अप व डाऊन धीम्या मार्गांवर) — (क्रॉस ओव्हर्स वगळून).
ब्लॉकमुळे खालीलप्रमाणे परिणाम होईल:
उपनगरीय रेल्वे गाड्यांचे कामकाज
* ब्लॉकच्या कालावधीत काही उपनगरीय सेवा रद्द राहतील.
* दिनांक २१.०३.२०२६ रोजी २२.४९ वाजता परळ येथून सुटणाऱ्या ट्रेन पासून
दिनांक २२.०३.२०२६ रोजी ००.१२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या 'डाऊन धीम्या' सेवा; तसेच
दिनांक २२.०३.२०२६ रोजी विद्याविहार येथून ०४.४५ वाजता सुटणाऱ्या ते ०९.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या सेवा मुलुंड स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि पुढे ठाणे स्थानकावर पुन्हा 'डाऊन धीम्या' मार्गावर वळवण्यात येतील. याव्यतिरिक्त, काही 'डाऊन धीम्या' सेवा दिवा स्थानकावर 'डाऊन जलद' मार्गावर वळवण्यात येतील आणि त्या कोपर व ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत.
* दिनांक २१.०३.२०२६ रोजी २३.२६ ते २३.५२ या वेळेत आणि दिनांक २२.०३.२०२६ रोजी ०३.२३ ते ०९.५५ या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या 'अप धीम्या' मार्गावरील गाड्यांना कल्याण येथे 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येतील; त्यामुळे या गाड्या ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत. पुढे दिवा आणि ठाणे स्थानकांदरम्यान या गाड्यांना पुन्हा 'अप धीम्या' मार्गावर वळवण्यात येईल. तसेच, ठाणे आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप धीम्या' मार्गावरील पुढील गाड्यांना 'अप जलद' मार्गावर वळवण्यात येईल.
* ब्लॉक कालावधीत, 'अप' आणि 'डाऊन' जलद गाड्या त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांवरही थांबतील.
* २२.०३.२०२६ (रविवार) रोजी डोंबिवली येथे समाप्त होणाऱ्या किंवा तिथूनच सुरू होणाऱ्या सर्व गाड्या रद्द राहतील.
* ब्लॉक कालावधीत, मुलुंड-ठाणे आणि दिवा-कल्याण या स्थानकांदरम्यानच्या 'अप' आणि 'डाऊन' दिशेकडील सर्व उपनगरीय गाड्या रद्द राहतील.
मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचे कामकाज
* ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या 'डाऊन' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना विद्याविहार/ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यानच्या ५ व्या मार्गावरून वळवण्यात येईल.
* ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथे येणाऱ्या 'अप' मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना कल्याण आणि ठाणे/विद्याविहार स्थानकांदरम्यानच्या ६ व्या मार्गावरून वळवण्यात येईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी