लातूर - भादा-औसा परिसरात भूगर्भातून आवाज; भूकंपाची अधिकृत नोंद नाही
लातूर, 20 मार्च (हिं.स.)। आज, २० मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील भादा आणि औसा परिसरात भूगर्भातून अनाकलनीय आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने तपासणी करून स्पष्ट केले आहे की
भुकंप


लातूर, 20 मार्च (हिं.स.)। आज, २० मार्च २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास लातूर जिल्ह्यातील भादा आणि औसा परिसरात भूगर्भातून अनाकलनीय आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, प्रशासनाने तातडीने तपासणी करून स्पष्ट केले आहे की, या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही.

नेमकी घटना काय?

शुक्रवारी दुपारी भादा व औसा परिसरातील काही गावांमध्ये जमिनीखालून आवाज आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने यंत्रणा हलवली आणि केंद्र सरकारशी संपर्क साधला.

NCS कडून मिळालेली माहिती

जिल्हा प्रशासनामार्फत या घटनेची माहिती तात्काळ National Center for Seismology (NCS), नवी दिल्ली यांच्याकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आली होती. NCS कडून प्राप्त अहवालानुसार: भादा-औसा परिसरात कोणत्याही तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली नाही. हा आवाज भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे (Natural Subterranean Sounds) निर्माण झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रशासनाचे आवाहन

लातूर जिल्हा प्रशासनाने जनतेला धीर देताना खालील सूचना केल्या आहेत: नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. भूगर्भातून आवाज येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असू शकते, त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. केवळ प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचेच पालन करावे. — जिल्हा प्रशासन, लातूर

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande